दांडीबहाद्दर ३२ अधिकाऱ्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - कर्मचाऱ्यांसह अधिकारीही कामाच्या वेळात गायब होणे, दांड्या मारणे हे नवीन नाही. मात्र, आगामी मॉन्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध विभागप्रमुखांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीसही ३२ अधिकाऱ्यांनी खुशाल दांड्या मारल्या. या सर्व दांडीबहाद्दरांना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नोटिसा देत खुलासा मागविला आहे. कोरम पूर्ण न झाल्याने पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मॉन्सूनपूर्व तयारीसंबंधी बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या एकूण ६४ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, अर्धेअधिक अधिकारी गैरहजर होते. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, हवामान विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बहुतांश मुख्याधिकाऱ्यांनी दांड्या मारल्या. या सर्वांना जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. सोमवारी झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे यासह आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करत ते तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, बहुतांश अधिकारी गैरहजर असल्याने पुढील आठवड्यात पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी बैठक घेण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad news notice to 32 officier