नव्या आयुक्तांसमोर जुन्या तक्रारींचा पाढा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रुजू झाल्यानंतर त्यांनी दोन दिवस कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. त्यानंतर आता पाण्याच्या प्रश्‍नात लक्ष घातले असून, शनिवारी (ता. १९) सकाळी जायकवाडी येथे जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे या वेळी नव्या आयुक्तांसमोर अधिकाऱ्यांनी जुन्याच समस्यांचे पाढे वाचले. जुने पंप, धरणातील पाणीपातळी कमी झाल्याचे कारण आयुक्तांना देण्यात आले. 

ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे नगरसेवक, नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलने केली. भाजप नगरसेवकांनी अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केल्यानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्‍त उदय चौधरी यांनी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांआड करण्याचे आदेश दिले; मात्र त्यानंतरही अद्याप अनेक भागांत चौथ्या ते पाचव्या दिवशी नळांना पाणी येत आहे. याबाबत नुकतेच रुजू झालेले आयुक्त डॉ. विनायक यांच्याकडे नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. कचऱ्यामधून थोडी उसंत मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी जायकवाडी येथे जाऊन योजनेची माहिती घेतली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी पंप जुने झाल्याने उपसा कमी होत असून, धरणातील पाण्याची पातळी पाच इंचांनी घटली आहे. 

त्यामुळे रोज पाच एमएलडीने कमी उपसा कमी होत आहे. सद्यःस्थितीत सुमारे १५५ ऐवजी १५० एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे. शहरात १३५ एमएलडीपेक्षा कमी पाणी येत आहे, असे चहेल यांनी आयुक्तांना सांगितले. 

पाहणी केली, सूचना काहीच नाही
आयुक्त प्रत्येक प्रश्‍न सोडविण्यासाठी बारीकसारीक माहिती घेत आहेत. त्यांनी शनिवारी बिडकीन येथील संप, फारोळा जलशुद्धीकरण केंद्र आणि नक्षत्रवाडी येथील एमबीआरचीही पाहणी केली. पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्‍यक असलेला औषधींचा साठा मुबलक प्रमाणात आहे की नाही, याचीही माहिती घेतला; मात्र सूचना काहीच केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news old complaint in front of new commissioners