औरंगाबादेत राजपूत संघटना एकवटल्या; 'पद्मावत'ला विरोध

मनोज साखरे
सोमवार, 22 जानेवारी 2018

पोलिस आयुक्तांना निवेदन

औरंगाबाद: वादात सापडल्यानंतर पुन्हा ग्रीन सिग्नल मिळालेल्या पद्मावत सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र, चित्रपटाला औरंगाबादेत मोठा विरोध होत आहे. चित्रपटविरोधात राजपूत समाजातील संघटना एकवटल्या असून विविध संघटनांनी पोलिस आयुक्तांना आज (सोमवार) निवेदन देत आपला रोष व्यक्त केला.

चित्रपट औरंगाबादेत प्रदर्शित होऊ नये, हिंदू, राजपूत यांच्या इतिहासाची छेड करून चित्रपट तयार केला आणि समाजाच्या भावना दुखावल्या असे निवेदनात नमूद आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास व समाजाने आक्रमक भूमिका घेतल्यास याला प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे चित्रपटगृहांना प्रदर्शनास बंदी घालावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर आंदोलन आणि विरोध करून चित्रपटगृहात जाऊन शो बंद पाडन्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: aurangabad news padmavat movie and rajput community opposition