भारत पेट्रोलियमचे शहरातील पेट्रोलपंप पडणार ड्राय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

औरंगाबाद - मनमाड येथील ऑईल डेपोत भारत पेट्रोलियमच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टचालकांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे भारत पेट्रोलियमच्या शहरातील दहाहून अधिक पेट्रोलपंपांचा इंधन पुरवठा बंद झाला आहे. हे पंप ड्राय पडणार आहेत. 

मनमाड येथील ऑईल डेपोतून औरंगाबाद शहरासह इतर जिल्ह्यांना पेट्रोल, डिझेल आणि ऑईल पुरविण्यात येते. याच ठिकाणी भारतीय पेट्रोलियमच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्यां ट्रॉन्स्पोर्टच्या संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. याचा परिणाम औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांतील भारतीय पेट्रोलियमच्या पंपावर होणार आहे. औरंगाबाद शहरात भारत पेट्रोलियमचे दहाहून अधिक पेट्रोलपंप आहेत. तसेच जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पंप कार्यन्वित आहेत. गेल्या 18 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलणार आहेत. या निर्णयामुळे पेट्रोलपंपचालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळेच सर्व पेट्रोल पंपचालक इंधनाचा मर्यादित साठा ठेवतात. भारत पेट्रोलियम पंपचालकही एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाचा साठा ठेवत असतात. यामुळे हे संप सुरू झाल्यापासून भारत पेट्रोलियमच्या पंपावर साठा लवकर संपण्याची शक्‍यता आहे. याविषयी भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: aurangabad news petrol pump