बनावट परीक्षार्थी बनलेल्या बडतर्फ पोलिसाला अटक 

मनोज साखरे
बुधवार, 10 जानेवारी 2018

औरंगाबाद - स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी राज्यात बनानट उमेदवारांचे रॅकेट सक्रिय आहे. अशांवर "सीआयडी'कडून कारवाई केली जात आहे. "सीआयडी'कडे आलेल्या बनावट परीक्षार्थींच्या एका प्रकरणात लातूर येथून बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक सुलतान सालेमियॉं बारब्बा याला औरंगाबाद येथील सीआयडीच्या पथकाने सोमवारी (ता. 8) अटक केली. पकडलेला संशयित बनावट परीक्षार्थी बनून परीक्षा देत होता. 

"सीआयडी'चे पोलिस अधीक्षक शंकर केंगार म्हणाले, की की मूळ परीक्षार्थीच्या जागी परीक्षा देणाऱ्या बनावट उमेदवारांचे राज्यभर रॅकेट असून, "सीआयडी'कडे अशी एकूण 49 प्रकरणे वर्ग झाली आहेत. यातील एका प्रकरणात सुलतान सालेमियॉं बारब्बा याने परीक्षा देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुलतान सालेमियॉं बारब्बा सध्या लातूर येथे राहतो. तो सांगली येथे उपनिरीक्षकपदावर कार्यरत होता; परंतु त्याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. मूळ उमेदवाराच्या जागी सुलतानने परीक्षा दिली होती. या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानंतर तपास "सीआयडीकडे' आला. 

आतापर्यंत संशयित पाच बनावट उमेदवार, तसेच पोलिसांनाही अटक केली आहे. हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. या बनावट उमेदवारांच्या मदतीने शासकीय नोकऱ्या मिळविणाऱ्यांवरही टाच येणार असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. 
- शंकर केंगार, पोलिस अधीक्षक, सीआयडी. 

Web Title: aurangabad news police crime