ऑपरेशन ऑल आऊटमध्ये  घातपातविरोधी तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

औरंगाबाद -  गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. एक) सायंकाळी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहनांची झाडाझडती घेऊन दोषी आढळून आलेल्या वाहनधारकांकडून तब्बल पावणेदोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

या मोहिमेत प्रमुख चौकांत नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी, वाहन थांबवून वाहन परवाना, सीटबेल्ट, हेल्मेट, वाहन परवाना तपासण्यात आला. या शिवाय मॉल्स, लॉज, हॉटेल, ढाब्यांचीही झाडाझडती घेण्यात आली. ऑल ऑऊट ऑपरेशनदरम्यान सर्वच ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांच्या पथकांनी २२५३ वाहनांची तपासणी केली. मोटार वाहन कायद्यांतर्गत ६४७ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ७६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर पोलिस स्टेशन स्तरावर २८ जणांना वॉरंट बजावण्यात आले. सहा जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकाने छावणी ईदगाह मैदान, रोजेबाग ईदगाह मैदान, रिलायन्स मॉल, शहानुरमियाँ दर्गा, डी. मार्ट, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक या परिसरामध्ये घातपातविरोधी तपासणी करण्यात आली. तसेच शहरातील १०३ हॉटेल्स, लॉजचीही कसून तपासणी केली. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली ७९ अधिकारी व ३९० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

Web Title: aurangabad news police fine