मिटमिट्यात पोलिसांचे ‘गुंडाराज’च - इम्तियाज जलील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - मिटमिट्यात कचऱ्याच्या प्रश्‍नावरून पोलिसांनी ‘गुंडाराज’ करीत महिलांसह पुरुषांना बेदम मारहाण केली. पोलिसांचे दगडफेकीचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली. मग नागरिकांच्या घरावर दगडफेक व महिलांना मारहाण करणाऱ्यांवरही गुन्हे का दाखल झाले नाहीत? तेथील नागरिक चोर आहेत, तर मग पोलिस काय ‘शरीफ’ आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सीसीटीव्हीत दिसणाऱ्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोमवारी (ता. १२) केली.

आमदार इम्तियाज जलील यांनी मिटमिट्यातील नागरिकांशी संवाद साधला. यात महिलांसह मुलांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गावातील महिलांनी दुपारी चारच्या दरम्यान विभागीय आयुक्‍त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यात विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांच्यासमोर महिलांनी गावात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. यात छाया गणेश मालोदे म्हणाल्या, की माझ्या घराचा दरवाजा तोडला,  माझ्या छोट्या मुलीच्या कानावर मारहाण केली. महिला, वृद्धांसह रुग्णांनाही सोडले नाही. आम्ही फक्‍त कचरा अडविला. पोलिसांनी घरात घुसून आम्हाला मारहाण केली. यामुळे गावातील पुरुष मंडळी घर सोडून लपून राहत असल्याचे महिलांनी सांगितले. काही पोलिसांनी घरातील साहित्यही लांबविल्याची तक्रार महिलांनी केली. 

आमदार जलील म्हणाले, की पोलिसांकडे वर्दी आहे म्हणून त्याचा कसाही वापर करू नये. ज्यांनी ऑर्डर दिली त्यांच्याकडेच तपासाचे काम देण्यात आले आहे. अटक केलेल्या तरुणांना सोडा अन्यथा आम्हालाही अटक करा. दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा, अशा अनेक मागण्या या वेळी मांडल्या. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे विभागीय आयुक्‍त भापकर यांनी सांगितले. यामुळे महिलांनी आंदोलन मागे घेतले.

Web Title: aurangabad news police garbage Imtiyaz Jaleel