शेवगावमधील चौघांचे "घाटी'त शवविच्छेदन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

औरंगाबाद - नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्यानगर भागात शनिवारी (ता. 17) रात्री एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर तपासकामासाठी तज्ज्ञ न्यायवैद्यकशास्त्रामार्फत अहवाल मिळावा, यासाठी या चौघांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 

अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), सुनंदा अप्पासाहेब हरवणे (48), स्नेहल अप्पासाहेब हरवणे (18) आणि मकरंद अप्पासाहेब हरवणे (15) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, की भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले अप्पासाहेब हरवणे हे शेवगाव येथील मिरी रस्त्यावरील विद्यानगर भागात राहतात. रविवारी (ता. 18) दूधवाल्याने दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने परिसरातील नागरिक त्यांच्या घरी गेले, तेव्हा घरातील सर्वांचे मृतदेह आढळून आले. 

सर्वजणांची हत्या एकाच प्रकारे गळे चिरून झाली असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना बोलावून पंचनामा करण्यात आला. मात्र, तपासकामात महत्त्वाची भूमिका ठरणाऱ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल तज्ज्ञांमार्फत मिळावा, यासाठी या चौघांचे शवविच्छेदन येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आल्याचे "घाटी' प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

Web Title: aurangabad news postmortem marathwada news

टॅग्स