खासगी सावकारीचे पीक जोमात 

शेखलाल शेख
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद - कमी पाऊस, गारपीट, बॅंकांच्या खेट्या, कर्ज माफीसाठीचे जाचक नियम आणि शेतीमालाचे मातीमोल दर आदी कारणांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळेच त्यांची पावले खासगी सावकारांच्या दारांकडे वळली आहेत. 2016 च्या तुलनेत राज्यामध्ये 2017 मध्ये खासगी सावकरांनी वाटप केलेल्या कर्जात 28.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

औरंगाबाद - कमी पाऊस, गारपीट, बॅंकांच्या खेट्या, कर्ज माफीसाठीचे जाचक नियम आणि शेतीमालाचे मातीमोल दर आदी कारणांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळेच त्यांची पावले खासगी सावकारांच्या दारांकडे वळली आहेत. 2016 च्या तुलनेत राज्यामध्ये 2017 मध्ये खासगी सावकरांनी वाटप केलेल्या कर्जात 28.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

या एका वर्षात राज्यभरातील परवानाधारक खासगी सावकरांनी 10 लाख 95 हजार 701 शेतकरी, व्यापारी, बिगर व्यापारी यांना तब्बल एक हजार 614 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. वर्ष 2016 मध्ये 12 हजार 208 सावकारांनी एक हजार 254 कोटी 97 लाखांचे कर्जवाटप केले होते. यात 2017 मध्ये वाढ होऊन 12 हजार 214 सावकारांनी एक हजार 614 कोटी 8 लाख रुपयांचे कर्जवाटप केले. सावकारांच्या कर्जवाटपाचा विचार केला, तर 2017 मध्ये सावकारीत कर्जवाटपात 28.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली. 

टक्केवारीच्या वाढीचे कारण 
गेल्या वर्षी सोयाबीन, तुरीच्या दराने शेतकऱ्यांना दगा दिला. यंदा बोंड अळीने कापूस उद्‌ध्वस्त झाला. कर्जमाफीतूनही बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर कायम राहिला. शेतीमधून कर्ज फिटून अपेक्षित उत्पन्न हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नसतो. 

सावकारही वाढले 
राज्यात सावकारीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास 2015 मध्ये 12 हजार 22 परवानाधारक सावकार होते. त्यात 2016 मध्ये 1.5 टक्‍क्‍यांची वाढ होऊन ही संख्या 12 हजार 208 झाली. 
राज्यातील परवानाधारक सावकार, त्यांनी वाटप केलेले कर्ज 

तपशील........................... वर्ष 2015 .......................2016.........................2017 
परवानाधारक सावकार..............12,022.....................12,208...................12,214 
कर्जदार सभासद..................7,04,452...................10,56,273.............10,95,701 
वाटप कर्ज (कोटीत)............896.34........................1,254.97................1,614.8 

Web Title: aurangabad news Private lender