दीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद शहरात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - सुमारे आठवडाभर ऊन आणि पावसाचा खेळ पाहणाऱ्या औरंगाबाद शहरवासीयांना पावसाने शनिवारी (ता. एक) सुखद धक्का दिला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

यंदा जून महिन्याच्या सुरवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शहराला चिंब केले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. शहरावर नुसताच ढगांचा घेरा होतो. हा घेरा कमी-जास्त होत असल्याने शहरात गेला आठवडाभर ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू होता. पावसासाठी पोषक आणि आवश्‍यक असलेल्या वातावरणाची निर्मिती होत नव्हती. त्यामुळे शहराला पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी शहरात पावसाने हजेरी लावत या प्रतीक्षेला विराम दिला. दुपारनंतर पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या.  

पावसासाठी अनुकूल वातावरण
पावसाच्या दडीमुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, पावसासाठी मंगळवारपर्यंत (ता. चार) अनुकूल वातावरण आहे. या काळात मोठा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: aurangabad news rain