जालना जिल्ह्यात दोन वीजबळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात परभणी, हिंगोली, जालना, लातूर व बीड जिल्ह्यात शुक्रवारी पाऊस झाला. अन्य ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जालना जिल्ह्यात वीज पडून दोन महिला मृत्युमुखी पडल्या, तर एक जखमी आहे. 

औरंगाबाद - मराठवाड्यात परभणी, हिंगोली, जालना, लातूर व बीड जिल्ह्यात शुक्रवारी पाऊस झाला. अन्य ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जालना जिल्ह्यात वीज पडून दोन महिला मृत्युमुखी पडल्या, तर एक जखमी आहे. 

धामणगाव (ता. बदनापूर) येथे उषा श्‍याम आढे (वय 23) व सुनीता राम आढे (वय 21) या दोघी शेतात कापूस वेचणी करत होत्या. अचानक विजांसह पावसाला सुरवात झाला अन्‌ त्यांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत उषा आढे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सुनीता गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कडेवर दहा महिन्यांचा मुलगा होता. दुर्घटना घडली तेव्हा तो बाजूला फेकला गेल्याने सुखरूप आहे. सुनीता आढे यांच्यावर जालन्याच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत पानेवाडी (ता. घनसावंगी) येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या शोभा लक्ष्मीकांत भागवत (वय 22) या महिलेचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी तालुक्‍यातही पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील देवणी महसूल मंडळात शुक्रवारी सकाळपर्यंत 50 मिमी पाऊस झाला. परभणी आणि जिंतूर शहरात दुपारी तासभर पाऊस झाला. हिंगोलीतही तुरळक सरी बरसल्या. औरंगाबाद शहरावर दुपारनंतर काळे ढग दाटले होते. त्यानंतर काही परिसरात हलक्‍या सरी बरसल्या. 

Web Title: aurangabad news rain jalna