औरंगाबादमध्ये भरपावसात पेन्शनधारकांचा पीएफ कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नांदेड-परभणी जिल्ह्यातील चारशे कामागारांचा सहभाग

औरंगाबाद: भरपावसात सत्तरी ओलांडलेल्या नांदेड व परभणी येथील चारशेहून अधिक पेन्शनधारकांनी गुरुवारी (ता.13) भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. निवृत्तीवेतनात साडेसहा हजारांची वाढ, महागाई भत्ता मिळण्यासह विविध मागण्यांसाठी कामागारांनी हे आंदोलन केले.

ईपीएस 95 पेन्शनर्स संघर्ष समितीतर्फे गुरुवारी सकाळी अकरा वाजता सिडको बसस्थानक येथून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरु होताच पाऊसानेही हजेरी लावली. पूर्णा सहकारी कारखाना, महावितरण, एसटी महामंडळसह विविध कंपन्यांमधील सेवानिवृत्तांनी सहभाग नोंदवला. निवृत्तीवेतनात साडेसहा हजारांची वाढ याप्रमुख मागणीसह क्षेत्रीय आयुक्‍तांची बदली करावी, अंतरीम वाढ म्हणून कोशीयारी कमिटीच्या शिफारसीप्रमाणे तीन हजार रूपये पेन्शन, महागाई भत्ता लागू करा, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सहा हजार पाचशेहून अधिक वेतनावर भविष्य निधी कपात असणाऱ्या सर्व कामगारांना वाढीव पेन्शन द्यावी, 20 वर्षे सेवा करणाऱ्या सर्व पेन्शनर्संना दोन वर्षे वेटेजचा फायदा लागू करा, पेन्शनर्संना मोफत आरोग्य सेवा पुरवाव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. पावसातही या आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला. हा मोर्चा सिडको बसस्थानकापासून जालना रोडमार्गे प्रोझोन जवळून भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडकला. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारले.

या वेळी एम. आर. जाधव, आर. एम. सूर्यवंशी, बी. एल. वानखेडे, भीमराव चव्हाण, पी. एम. कुलकर्णी, ए. एस. दाभाडे, के. डी. उपाडे, मधुकर मुंडे, पी. आर. देशमुख, पी. डी. चामणीकर, जी. जी. कुलकर्णी, टी. के. टापरे यांची उपस्थिती होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: aurangabad news rain pf office rally