शारीरिक संबंधास विरोध करणाऱ्या मुलीचा खून करणाऱ्याचा जामीन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शारीरिक संबंधास विरोध केला म्हणून हनुमंतखेडा (ता. सोयगाव) परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या आरोपीचा न्यायालयात दुसऱ्यांदा सादर झालेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी (ता. 26) फेटाळला. 

औरंगाबाद - शारीरिक संबंधास विरोध केला म्हणून हनुमंतखेडा (ता. सोयगाव) परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या आरोपीचा न्यायालयात दुसऱ्यांदा सादर झालेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी (ता. 26) फेटाळला. 

हनुमंतखेडा येथील सीमा राठोड (वय 15) ही 14 जुलै 2017 रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेली असता, आरोपी शेख मुस्ताक शेख महेमूद (वय 22), ज्ञानेश्‍वर जानसिंग राठोड (वय 22), भुऱ्या भालचंद पवार (वय 21) व शेख महेमूद शेख माजिद (वय 41, सर्व रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) यांनी तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी घाटनांद्रा घाट शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वरील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांची रवानगी प्रथम पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणी शेख महेमूद शेख माजिद याने यापूर्वी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळला होता. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी महेमूद याने पुन्हा दुसऱ्यांदा नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पूर्वीच्या व सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही व महेमूद याला जामीन मंजूर केल्यास जातीय तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने महेमूदचा नियमित जामीन फेटाळला. 

Web Title: aurangabad news rape case