सांडपाण्याचा वापर करून महापालिका धुणार रस्ते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - कांचनवाडीत येथील मलजल प्रक्रिया प्रकल्पातून (एसटीपी प्लॅंट) निघणाऱ्या पाण्याचा वापर आता रस्ते धुण्यासाठी केला जाणार आहे. ही मोहीम बुधवारी (ता. दहा) रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे रस्त्यावरील धुळीचे प्रमाण कमी होईल, असे उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले. 

भूमिगत गटार योजनेअंतर्गत कांचनवाडी येथे महापालिकेने एसटीपी प्लॅंट उभारला आहे. १६१ एमएलडी क्षमतेच्या या प्लॅंटची नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. हे पाणी उद्योगांना देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणीही पाण्याची मागणी केलेली नाही. त्यामुळे हे पाणी शहरातील रस्ते धुण्यासाठी वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात श्री. औताडे म्हणाले, की शहरवासीयांना सध्या धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी रस्ते धुण्यात येतील. या प्रकल्पाजवळ स्टॅंड पोस्ट तयार करण्यात आले आहेत; तसेच दोन टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या टॅंकरवर नॉट फॉर ड्रिंकिंग पर्पज अशा पद्धतीचा मजकूर मोठ्या अक्षरात लिहिण्यात येणार आहे. बुधवारी रात्रीपासून रस्ते धुण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे.

Web Title: aurangabad news Road to municipal washing using wastewater