दानवेंच्या निषेधार्थ "आसूड'चे औरंगाबादमध्ये सामूदायिक वाचन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी नुकतेच शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून रविवारी (ता. 28) क्रांती चौकात किसानपुत्रांनी महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड'चे सामुदायिक वाचन केली. या वेळी किसानपुत्रांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 

औरंगाबाद-  भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी नुकतेच शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून रविवारी (ता. 28) क्रांती चौकात किसानपुत्रांनी महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड'चे सामुदायिक वाचन केली. या वेळी किसानपुत्रांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 

किसानपुत्रांनी दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करत भोकरदन येथे त्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर रविवारी क्रांती चौकात "आसूड'चे सामूहिक वाचन केली. रावसाहेब दानवे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा छळ करून आंदोलन मोडीत काढणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तूर खरेदीतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी, शेतकऱ्यांकडील तूर संपेपर्यंत खरेदी सुरू ठेवावी, त्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यावा अशा मागण्या अक्षय पुराणिक यांच्यासह किसानपुत्रांनी केल्या आहेत.

Web Title: Aurangabad news sakal news protest against danve