शाळांच्या खासगीकरणाचा डाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

औरंगाबाद - महापालिका शाळांच्या इमारती व जागा खासगी संस्थांना वापरण्यासाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत येण्याची शक्‍यता आहे. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. वास्तविक पाहता महापालिकेच्याच मुकुंदवाडी, जवाहर कॉलनी, मिटमिटा येथील शाळांतील शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने तेथील विद्यार्थी खासगी संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड गुण मिळवितात; मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याचे निमित्त पुढे करून महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

महापालिकेच्या ७० शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास गरीब विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण महापालिकांच्या शाळांमध्येही मिळू शकते; परंतु शाळांच्या दर्जाविषयी चिंता व्यक्‍त करून उपाययोजना करण्याऐवजी या शाळांच्या इमारती व जागा खासगी संस्थाचालकांकडे सोपविल्या जातील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सातत्याने जाणवत आहे. महापालिका प्रशासनाने नालासफाईचे काम सुरू केले; पण हे काम समाधानकारक झालेले नाही. काढलेला गाळ नाल्याच्या काठावरच टाकला जात आहे. पावसामुळे गाळ पुन्हा नाल्यात जाईल, अशी भीती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी व्यक्त केली.

आयुक्‍तांचे मत जाणून घेणार
स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सांगितले, की परिसर मोठा आहे; पण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, त्या शाळा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शाळा ताब्यात घेईल, त्या संस्थेने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी अट त्या संस्थेला घातली जाईल. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, आयुक्तांचे मत जाणून घेऊ. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवून त्याला मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले. 

Web Title: aurangabad news school Privatization