निवडीपुर्वीच झळकले नवे महापौर उपमहापौरच्या अभिनंदनाने पोस्टर 

प्रकाश बनकर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

शिवसेना-भाजपच्या जिल्हापक्षातर्फे औरंगपुऱ्यात सरस्वती भूवन कॉलेज समोर भव्य असे पोस्टर झळविण्यात आले आहेत. शिवसेनेकडे-28 तर भाजपकडे-23 नगरसेवक आहेत. दोघांचे मिळून 51 नगरसेवक आहेत. तसेच अपक्ष निवडून आलेले 17 नगरसेवकांचाही पाठिंबा युतीस असल्यामूळे युतीचे संख्याबळ 70 ते 71 च्या घरात जाणार आहेत. याच आत्मविश्‍वासामूळे हे पोस्टर झळकविण्यात आले असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

औरंगाबाद - शिवसेना-भाजप यांच्या युतीच्या कररानुसार रविवारी नवीन महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे. शिवसेनचा महापौर तर भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर असे समीकरण असणार आहे. ही निवडणूक होण्यापुर्वीच औरंगपूऱ्यात शिवसेना आणि भाजपतर्फे नवे नियुक्‍त महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांचे अभिनंदनाचे फोस्टर झळकवले आहेत. युतीचे समीकरण जुळाल्यामूळेच हे पोस्टर लावण्यात आला असल्याची चर्चा आहे. 

महापौर पदासाठी सुरुवातीला भाजपानेही हालचाली केल्या होत्या.मात्र युतीच्या कराराप्रमाणेच पाच वर्षेपुर्ण करण्यात येणार आहेत. महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहिर केले होते. यामूळे महापौरपद शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद भाजपकडे जाणार आहे. रविवारी (ता. 29) ला दुपार नंतर दोन्ही पदासाठी निवड प्रक्रीया होत आहे . दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यामूळेच युतीचा विजय नक्‍की मानला जातो. यामूळे शिवसेना-भाजपच्या जिल्हापक्षातर्फे औरंगपुऱ्यात सरस्वती भूवन कॉलेज समोर भव्य असे पोस्टर झळविण्यात आले आहेत. शिवसेनेकडे-28 तर भाजपकडे-23 नगरसेवक आहेत. दोघांचे मिळून 51 नगरसेवक आहेत. तसेच अपक्ष निवडून आलेले 17 नगरसेवकांचाही पाठिंबा युतीस असल्यामूळे युतीचे संख्याबळ 70 ते 71 च्या घरात जाणार आहेत. याच आत्मविश्‍वासामूळे हे पोस्टर झळकविण्यात आले असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

Web Title: aurangabad news: shiv sena bjp politics