अत्याचार प्रकरणात बहिणीच्या पतीला सोमवारपर्यंत कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मेहुणीचे आंघोळ करताना चित्रीकरण करीत धमकी देऊन वारंवार अत्याचार करणाऱ्या मेहुण्याला (भावोजी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. अतार यांनी सोमवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडी सुनावली.

औरंगाबादेत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेली तेजश्री (नाव बदललेले आहे) सिडको भागात तिच्या बहिणीकडे राहते. तेजश्रीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती बी.कॉम. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. सप्टेंबर २०१७ या काळात बहिणीच्या घरी वास्तव्यादरम्यान तेजश्री ही आंघोळ करीत असताना संशयिताने तिचे छायाचित्रीकरण केले व तेजश्रीकडून शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यास विरोध करताच छायाचित्रीकरण इतरांना दाखवून  बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली. सतत धमकी देऊन त्याने आठ वेळा अत्याचार केला. तेजश्रीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून तिच्या बहिणीच्या पतीवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान गुरुवारी (ता. २४) सहायक सरकारी वकील योगेश तुपे पाटील यांनी संशयिताकडून संबंधित छायाचित्रण जप्त करावयाचे असून आरोपीची वैद्यकीय चाचणी करावयाची आहे. असा युक्तिवाद करीत पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: aurangabad news Sister husband police custody