चिमुकलीने काढली रात्र विहिरीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

देवगाव रंगारी -  देवळाणा (ता. कन्नड) येथील नऊवर्षीय मुलगी खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने चोरांच्या भीतीने रात्र जागून काढली; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी एका पडक्‍या विहिरीत सुखरूप सापडली. या मुलीने अख्खी रात्र त्या विहिरीत काढली.

देवगाव रंगारी-गल्लेबोरगाव रस्त्यावरील देवळाणा गावात मंगळवारी (ता.१२) सायंकाळी सहाच्या सुमारास आदिती सुरासे ही नऊ वर्षांची मुलगी खेळण्यासाठी अंगणात गेली. रात्री जेवणाची वेळ झाली तरी आदिती घरी आली 

नसल्याने आई-वडिलांनी आदितीचा संपूर्ण गावात शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नसल्याने तिचे अपहरण झाल्याच्या भीतीने सुरासे कुटुंब घाबरले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा शोध सुरू झाला. रात्रभर संपूर्ण गावात, शेतात व परिसरात शोध घेतला तरी मुलगी सापडली नाही. भरीस भर म्हणून या भागात चोर येत असल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मुलीचे अपहरण झाल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.

बुधवारी सकाळी मुलीचे आजोबा रामभाऊ सुरासे यांनी गावाजवळच्या एका कोरड्या विहिरीत डोकावून पाहिले असता तिथे मुलगी दिसली. तिला आवाज दिल्यावर विहिरीतून प्रतिसाद मिळाला. यावेळी विलास सुरासे, आकाश उबाळे, गणेश उबाळे, सुनील सुरासे, आनंद उबाळे, अशोक जाधव, गिरीश सोनवणे, शिवनाथ कांबळे आदींनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीला विहिरीबाहेर काढले. बेपत्ता मुलगी सापडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

खेळताना पाय घसरून पडली
ज्या विहिरीत मुलगी सापडली ती विहीर तीस फूट खोल आहे. यात खेळता खेळता आदिती पाय घसरून पडली. नऊ वर्षांच्या मुलीने अन्नपाण्याविना नऊ तास मोठ्या धाडसाने विहिरीत काढले. मात्र, तीस फूट खोल विहिरीत पडूनही आदितीला कुठेही जखम न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तिला मुका मार बसला असून, रात्रभर विहिरीत राहिल्याने ती घाबरली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची देवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सोशल मीडियात तिचा फोटो, नाव, गाव इत्यादी माहितीसह शोध घेण्याचे आवाहन विविध ग्रुपद्वारे करण्यात आले होते.

Web Title: aurangabad news small girl full night in well