पॅनसिटी मॉडेल राहणार शहराच्या फायद्याचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - स्मार्ट सिटीअंतर्गत शहराच्या एका बाजूला प्रस्तावित असलेल्या ग्रीनफिल्ड टाऊनशिपपेक्षा संपूर्ण शहराच्या दृष्टीने पॅनसिटी मॉडेलच अधिक फायदेशीर राहणार आहे. यामुळे चिकलठाणा येथील नियोजित ग्रीनफिल्ड टाऊनशिप रद्द करता येईल का? याबाबत ‘एसपीव्ही’च्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटीचा मूळ प्रस्ताव सादर करताना त्यात चिकलठाणा परिसरात ग्रीनफिल्ड टाऊनशिप विकसित करणे आणि पॅनसिटी मॉडेलमध्ये नागरी वाहतूक सेवा व घनकचरा व्यवस्थापन या दोन घटकांवर काम करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण स्मार्ट सिटीचा हा प्रस्ताव १७२४ कोटी रुपयांचा असून ११३० कोटी रुपये फक्‍त ग्रीनफिल्ड टाऊनशिपवर खर्च करण्यात येणार आहेत. ग्रीनफिल्ड टाऊनशिप विकास हा फक्‍त एका भागापुरता मर्यादित राहणार आहे. तर पॅनसिटीतून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा लाभ शहरातील नागरिकांना होणार आहे. महापालिका आयुक्‍त श्री. मुगळीकर यांनी सांगितले, की पॅनसिटीअंतर्गत निवडलेल्या घटकांवरच अधिकाधिक भर देऊन शहरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ग्रीनफिल्डऐवजी शहराला पॅनसिटीचाच जास्त फायदा होणार आहे. यामुळे ग्रीनफिल्ड रद्द करायचे झाल्यास तसा नवीन प्रस्ताव द्यावा लागेल. ‘एसपीव्ही’च्या बैठकीपुढे हा मुद्दा उपस्थित करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक लवकरच स्मार्ट सिटीची बैठक घेणार असून, त्यांच्या उपस्थित होणाऱ्या ‘एसपीव्ही’च्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यानंतर केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे श्री. मुगळीकर यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news smart city