जवान संदीप जाधव हुतात्मा झाल्याचे समजले अन्...

सचिन चोबे
शुक्रवार, 23 जून 2017

सिल्लोड: सिल्लोड (जि. औरंगाबाद) पासून पस्तीस किलोमीटर असलेल्या केळगाव शिवारातील गोकुळवाडी या तीस ऊंबऱ्याच्या वस्तीवर अकरा वाजेच्या सुमारास आक्रोश... हुंदके... शोककळा पसरलेली होती. गुरूवार (ता. 22) रोजी संध्याकाळच्या सुमारास या गावातील जवान संदीप जाधव पूंछ सेक्टर मध्ये झालेल्या गोळाबारीमध्ये हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवारावर आभाळच कोसळले.

सिल्लोड: सिल्लोड (जि. औरंगाबाद) पासून पस्तीस किलोमीटर असलेल्या केळगाव शिवारातील गोकुळवाडी या तीस ऊंबऱ्याच्या वस्तीवर अकरा वाजेच्या सुमारास आक्रोश... हुंदके... शोककळा पसरलेली होती. गुरूवार (ता. 22) रोजी संध्याकाळच्या सुमारास या गावातील जवान संदीप जाधव पूंछ सेक्टर मध्ये झालेल्या गोळाबारीमध्ये हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवारावर आभाळच कोसळले.

टीव्हीवर संदीप यांच्या मुलीने रात्री तिच्या वडीलाचे नाव बघितले आणी काही माहिती मिळण्याच्या आत जवळपास असलेल्या मित्रांनी टीव्ही बंद करुन टाकले. वयोवृद्ध आई वडील, पत्नी यांना काही माहिती मिळून धक्का न मिळण्यासाठी मित्र परिवाराने काळजी घेतली. आज (शुक्रवार) सकाळी गावात त्यांच्या घरी माहिती देण्यात आल्या नंतर मात्र या परिवारावर घरातील कर्ता पुरुष देशाची सेवा करतांना हुतात्मा झाल्यामुळे काही शब्दच निघत नव्हते.

घटनेची माहिती मिळताच गोकुळवाडीच्या घरातील कोणाच्याच चुली पेटल्या नाही. दोन महिन्यापूर्वी पत्नीच्या भावाच्या लग्नासाठी आलेले संदिप यांनी महिन्याची सुट्टी संपवून दोन महिन्यापूर्वी परत हजर होऊन सेवा बजावत असतांना त्यांना वीरमरण आले. शनिवार (ता. 24) रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते चार दिवसाची सुट्टी घेऊन येणार असल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. नियतिला मात्र हे मान्य झाले नाही. तीन वर्षाची मुलगी मोहिनी, एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र आई, वडील व पत्नी असा परिवार असलेल्या संदीप यांना देशाची सेवा करताना वीरमरण आले. याच गावातील 2003 साली हुतात्मा झालेले माधवराव गावंडे, 2010 साली हुतात्मा झालेले काळूबा बनकर व आता 2017 साली हुतात्मा झालेले संदीप जाधव यांच्या बरोबर सात-सात वर्षाच्या वीरमरनामुळे हा धक्का जीवाला चटका लावनारा आहे.

गोकुळवाडी वस्तीवर दुपारी संदीप यांच्या घरासमोर जमलेल्या प्रतेकाच्या डोळ्यात पाणी व मनामध्ये पाकिस्तानचा द्वेष दिसत होता. त्यांचे काका दुर्गादास जाधव यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देतांना छुप्या मार्गाने सैनिकांवर होत असलेल्या हल्याचा आक्रोश करीत सरकारने एकदाच पाकिस्तान बरोबर युद्ध करुन जशाश तसे उत्तर द्यावे, असा आक्रोश केला.

सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे संदीप
गोकुळवाडी वस्तीवर सुट्टीमध्ये सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे संदीप हे आबा या नावाने ओळखले जात होते. दोन महिन्यांपूर्वी आल्यानंतर सुद्धा त्यांनी सर्वांची चौकशी केल्याची माहिती वस्तीवरील सर्वच जन बोलून भावनांना वाट करुण देत रडत होते.

हुतात्मा संदीप जाधव यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा लाइट इन्फन्ट्रीतील नाईक शहीद संदीप सर्जेराव जाधव (रा. केळगाव ता. सिल्लाेड, जि. औरंगाबाद) यांचे पार्थिव जम्मू येथून विमानाने वडाेदरा (गुजरात) मार्ग औरंगाबाद विमानतळ येथे येईल. तेथून केळगाव येथे नेण्यात येईल. औरंगाबादला आज सांय़ ६:३० वाजता पार्थिव पाेहचू शकते. तर अंत्यविधी उद्या (ता. २४) सकाळी ९  वाजता  हाेईल, असे सांगितले जाते.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Web Title: aurangabad news solder sandeep jadhav martyred

फोटो गॅलरी