पाशवी कृत्यास विरोध केल्यानेच त्या चिमुकलीला ठेचून मारल्याचे उघड

soygaon murder
soygaon murder

सोयगाव : पाशवी कृत्य करण्यास विरोध केल्यानेच अल्पवयीन बालिकेच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून दगडाने ठेचून तिचा खून केल्याची कबुली या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने सोमवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास दिल्याने, चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना मंगळवारी (ता. १८) अटक केल्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंग यांनी केली. त्यामुळे हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्येचा कट (ता. १८) उघडकीस आला आहे. 

अल्पवयीन बालिकेने बलात्कारास विरोध केल्याने या नराधमांनी तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे. दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी किशोर नवल राम यांनी मंगळवारी (ता. १९) हनुमंतखेडा गावास तातडीची भेट देवून तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील पीडित मुलगी ही गावाबाहेर असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता, गावातीलच एकाने तिच्यावर पाळत ठेवून शेतातील एका फार्महाऊसवर तिला विहिरीजवळून उचलून आणले व तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने तिने विरोध केल्याने तिचा चौघांनी गळा आवळून दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये संशयावरून ताब्यात घेतलेल्या मुश्ताक शेख (वय २२), भुरा बालचंद पवार (वय २१), नानू जानसिंग राठोड (वय २१), पवन माधव चोतमल (वय १७) (सर्व रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव) या चौघांना अटक करण्यात आली असून, रात्री उशिरा यातील तिघांना सोयगावच्या न्यायालयासमोर हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी पवन माधव चोतमल याला औरंगाबाद येथील बाल न्याय मंडळ येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी एका नवीन आरोपीस पोलिसांच्या पथकाने रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचा सापळा
दरम्यान घटना उघडकीस आल्याच्या दिवशी (ता. १५) पोलिसांनी गावातीलच मुश्ताक शेख यास संशयावरून ताब्यात घेतले होते व पहिल्याच दिवशी रात्री त्यास सोडून दिले. परंतु, पोलिसांचा संशय मुश्ताकवर जास्तच बळावला असल्याने सोडून दिलेल्या मुश्ताकवर पाळत ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. पोलिसांनी गावातच साध्या गणवेशात मुश्ताकवर पाळत ठेवून त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकरवर ठेवला. गुन्हे शाखा पथक आणि सोयगावचे पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी एका कॉलवरून मुश्ताक यास पुन्हा ताब्यात घेऊन त्याचेकडून उर्वरित गुन्हेगारांची नावे कबुली जबाबातून घेतली. दरम्यान उर्वरित तिघांना हनुमंतखेडा गावातूनच घरातून अटक करून (ता. १७) रात्रीच्या सुमारास कन्नड पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

सुरक्षेच्या कारणावरून कन्नडला अटक
दरम्यान सोयगाव पोलिसांनी व गुन्हे शाखा पथकाने हनुमंतखेड्यातून ट्रेस झालेले आरोपी ताब्यात घेऊन कन्नड शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले व कन्नडला अटक करण्यात आली. हनुमंतखेड्यातील पीडितेचा मृतदेह सिल्लोड पोलिसांच्या हद्दीत सापडला त्यामुळे सिल्लोडला गुन्हा दाखल, कन्नडला आरोपींना अटक आणि सोयगावच्या न्यायालयात हजर करण्याची त्रिसूत्री प्रक्रिया जिल्हा पोलिस दलाला राबवावी लागली. सुरक्षेच्या कारणावरून या आरोपींना कन्नड शहर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

हनुमंतखेड्याला जिल्हाधिकारी यांची भेट
हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १८) औरंगाबादचे जिल्हाधिकारी किशोर नवल राम यांनी तातडीने पीडितांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. दरम्यान, घडलेली घटना अतिशय क्रूर आहे. यातील आरोपीही सापडले आहे. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल त्यामुळे संयम सोडू नका. तसेच पीडिताच्या कुटुंबियांना शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ देण्यात येईल. घरकुल योजनेचा प्रस्ताव तातडीने संबंधित कुटुंबीयांचा पाठवावा अशा सूचना तालुका प्रशासनाला करण्यात येऊन पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून तातडीने दोन लाखाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, आठवडाभरात या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर नवल राम यांनी पीडितांच्या कुटुंबियांना दिले. यावेळी तहसीलदार छाया पवार, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, सरपंच दादाभाऊ चव्हाण, युवा सेनेचे स्वप्नील पाटील आदींची उपस्थिती होती.

गुन्ह्याचा तपास वर्ग
दरम्यान सिल्लोड पोलिसांकडे दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सोयगाव पोलिस त्यानंतर कन्नड पोलिस आणि पुन्हा सोयगाव पोलिस असा बदलत असल्याने हनुमंतखेड्याच्या घटनेत सिल्लोड सोयगाव आणि कन्नड अशी तिहेरी पोलिसांची भूमिका आहे.

हनुमंतखेडूयात सलग चौथ्या दिवशीही सन्नाटा
दरम्यान हनुमंतखेड्यातील अल्पवयीन बालिकेचा पाशवी कृत्य करण्यास नकार दिल्याने तिचा क्रूरपणे खून झाल्याची घटना उघड झाल्याने हनुमंतखेड्यात पुन्हा सन्नाटा पसरल्याचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने घटनेत मृत झालेल्या बालिकेला मंगळवारी ता.१८ श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन ता.१८ सायंकाळी क्यांदल मार्च काढण्यात आली होती आख्खा गाव या क्यान्दल मार्च मध्ये सहभागी झाला होता,त्यामुळे ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ आरतीसिंग यांनी शिताफीने तपासचक्रे फिरवून सोयगावचे पोलिस निरीक्षक सुजित बडे,सिल्लोड ग्रामीणचे सहायक निरीक्षक शंकर शिंदे,गणेश जागडे आदींनी शिताफीने संशयितांना ताब्यात घेवून गुन्ह्याची शिताफीने उकल केली.पोलिस अधीक्षक आरतीसिंग,उप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप वैराळे,नीरज राजगुरू,सोयगावचे पोलिस निरीक्षक सुजित बडे,सिल्लोड ग्रामीणचे सहायक निरीक्षक शंकर शिंदे,उपनिरीक्षक गणेश जागडे,सुभाष पवार, योगेश झाल्टे,दीपक पाटील,सतीश पाटील,आदि करत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com