कोकणाच्या गौरी गणपतीने एसटीच्या महसुलात घसरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागांसाठी औरंगाबाद विभागाने एसटी बस पाठविल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद आगाराच्या महसुलावर परिणाम झाला. तब्बल सहा लाख रुपयांच्या महसुलावर औरंगाबाद विभागाला पाणी सोडावे लागले. 

गणेशोत्सव आणि गौरीपूजन या दोन्ही सणांनी मुंबईसह कोकणातील वातावरण ढवळून निघत असते. यासाठी मुंबई येथून कोकणात जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. कोकणातील बहुतांश चाकरमानी मुंबईत नोकरी करतात आणि गणेशोत्सवाला प्रत्येक जण आपल्या मूळ गावी जात असतो. म्हणूनच या काळात एसटी महामंडळाच्या राज्यभरातील बसगाड्या मुंबई विभागात मागविण्यात येत असतात. यंदाही कोकणासाठी एसटी महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद आगाराच्या प्रत्येकी 115 बसगाड्या पाठविण्यात आल्या होत्या. औरंगाबाद विभागातर्फे दररोज एक लाख 90 हजार किलोमीटरचा प्रवास एसटी बसगाड्या करीत असतात. मात्र कोकणात पाठवलेल्या 115 बसगाड्यांमुळे हा प्रवास बावीस हजार किलोमीटरने घटला आहे. यामुळे औरंगाबाद विभागाचे गेल्या आठ दिवसांमध्ये सहा लाख 27 हजार रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. 

Web Title: aurangabad news st bus