एसटी प्रशासनाचा आडमुठेपणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगाने तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १९) एसटी प्रशासनाने विश्रामगृहात थांबलेल्या बाहेरगावच्या चालक-वाहकांना हुसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे मध्यवर्ती आगार आणि सिडको आगारात कर्मचाऱ्यांनी परिवहनमंत्री हाय, हायच्या घोषणा देत दिवाकर रावते यांच्याविरोधात संताप व्यक्त केला.

दरम्यान, बाहेरगावच्या सर्व वाहकांकडे असलेली रक्कम आणि लॉगशिट जमा करून घ्या आणि आम्हाला मुक्त करा, असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. दुसरीकडे तुम्ही तुमची गाडी घेऊन निघा, असे प्रशासनाचे म्हणणे होते. लेखी द्या अन्यथा पोलिसांना बोलावून आम्हाला हाकला, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने सायंकाळी उशिरापर्यंत हाच घोळ सुरू होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून संताप व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन आयोगानुसार वेतन मिळावे या मागणीसाठी सोमवारी (ता. १६) संप सुरू केला आहे. या संपामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचे विभागाचे नुकसान झाले आहे. सिडको व मध्यवर्ती बसस्थानकात बाहेरून आलेल्या आणि संपाने अडकून पडलेल्या साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांवर दबावतंत्र 
एसटीच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह ताब्यात घेण्यासाठी सारखे फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. सकाळपासून कर्मचाऱ्यांनी विश्रामगृह खाली केले का, नसेल तर खाली करून घ्या, असा दबाव अधिकाऱ्यांवर टाकण्यात येत होता. सायंकाळी सहापर्यंत अधिकारी-कर्मचारी नेत्यांना समजावून विश्रामगृह खाली करा, असे साकडे घालत होते. तर लेखी द्या, रीतसर गाडीचा चार्ज घ्या, अन्यथा पोलिसांना बोलवून आम्हाला अटक करा, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.

Web Title: aurangabad news st bus