औरंगाबादेत एसटी कामगारांची जोरदार निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

चिकलठाणा कार्यशाळा व विभागीय कार्यशाळेतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला आहे. संप सुरू झाल्याने प्रवाशी प्रचंड त्रस्त झाले आहेत, काळी पिवळी आणि रिक्षा चालक मनमानी भाडे आकारत आहेत.

औरंगाबाद : एसटी कामगार संपाला सोमवारी (१६) रात्री बारावाजे पासून सुरुवात झाली आहे.

सकाळी आरटीओने काही खासगी गाड्या बस स्टँडवर पाठवल्या, मात्र कामगारांनी हुसकावून लावल्या, केवळ तीन पाच कामगार कामावर आले, त्यामुळे सोलापूर, बऱ्हाणपूर आणि पुणे अश्या तीन गाड्या पाठवण्यात आले, एक पुणे विनावाहक गेली, मात्र सोलापूर सिडको बुसस्टँड तर सिल्लोड येथे कामगारांनी अडवून ठेवली. मध्यवर्ती बुसस्टँड मध्ये प्रचंड निदर्शने केली. जे नाईट राऊंडला कामगार आलेले आहेत, त्याची भोजनाची व्यवस्था कामगारांनी निधी गोळा करून केली. सिडको बसस्थनाकात वाहतूक नियंत्रकांना बांगडया भरन्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

चिकलठाणा कार्यशाळा व विभागीय कार्यशाळेतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला आहे. संप सुरू झाल्याने प्रवाशी प्रचंड त्रस्त झाले आहेत, काळी पिवळी आणि रिक्षा चालक मनमानी भाडे आकारत आहेत. आगार प्रमुख स्वप्नील धनाड पाटील, बसस्थानक प्रमुख कृष्णा मुंजाळ, विभागीय वाहतूक अधीकारी संदीप रायलवर तळ ठोकून होते.

Web Title: Aurangabad news ST employee agitation