औरंगाबाद : एसटी कामगार संपाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

संपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत.

औरंगाबाद : एसटी कामगार संपाला सोमवारी (१६) रात्री बारावाजे पासून सुरुवात झाली आहे. जे कर्मचारी ड्युटीवर राहणार असे सांगत होते तेही एस. टी. डेपो कडे फिरकले नाहीत, त्यामुळे रात्रीचे जवळपास सर्व शेड्युल रद्द करावे लागले. 

संपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत. कॅडक्टर ड्रायवर यांनी गाड्या चालवण्यास नकार दिला, त्याच प्रमाणे चिकलठाणा कार्यशाळा व विभागीय कार्यशाळेतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला आहे.

संप सुरू झाल्याने प्रवाशी गायब झाले आहेत. दुसरीकडे खाजगी बसगाड्या, काळी पिवळी व अन्य वाहन धारकांनी प्रवंशाची लुट सुरू केली आहे. रात्री 46 शेड्युल रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख स्वप्नील धनाड पाटील यांनी दिली.

Web Title: Aurangabad news ST workers strike