ग्राहकांना अरेरावी; श्‍वानांसाठी सुखसोयी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - बिल दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला अरेरावीची उत्तरे देणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात मोकाट श्‍वानांची मज्जा आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याचा कडाक्‍यामुळे रस्त्यावरील श्‍वान महावितरणच्या कार्यालयात चक्क पंख्याखाली झोपा काढत आहेत. 

महावितरणच्या ज्युबली पार्क कार्यालयात वीजबिल दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्यांचा कायम राबता असतो. एका ग्राहकाने नुकतेच बिल भरलेले असताना पुन्हा बिल आल्यावर तो येथील ग्राहक खिडकी क्रमांक चारकडे गेला. तेथे असलेल्या एका कर्मचाऱ्याने या ग्राहकाला जुने बिल का भरले नाही म्हणून चक्क खडसावले. जुन्या भरलेल्या बिलाचा पुरावा पाहून नव्या बिलात दुरुस्ती करून मिळणार नाही का? असे विचारले असता ग्राहकाला थांबवत त्यांनी बिल दुरुस्त करून दिले. एकीकडे ग्राहकाला अशी वर्तणूक मिळत असताना दुसरीकडे हे कार्यालय आहे, की श्‍वानांचा आराम कक्ष असा प्रश्न येणाऱ्या-जाणाऱ्यांना पडला होता. कार्यालयात सुरू असलेल्या पंख्यांखाली चक्क मोकाट श्‍वान झोपले असल्याचे चित्र होते. या श्‍वानांना कोणी हाकलण्यास तयार नसल्याचेही येथे दिसून आले. 

Web Title: aurangabad news street dog in MSEB office