महिला महाविद्यालयात २० विद्यार्थिनींना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - महिला महाविद्यालयाच्या २० विद्यार्थिनींना मेसच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सायंकाळी घडली. सर्व बाधित विद्यार्थिनींना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या वसतिगृहातच राहत असून त्यांना मेसचेच जेवण घ्यावे, अशी सक्ती महाविद्यालयाकडून झाल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली.

विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या इंदिराबाई भास्करराव पाठक महिला वसतिगृहात राहतात. त्याच ठिकाणी विद्यार्थिनींची मेस आहे. मंगळवारी मेसमध्ये विद्यार्थिनींना गोड खाद्यपदार्थ देण्यात आले. विद्यार्थिनींचे दुपारपर्यंत जेवण आटोपल्यानंतर काही मुलींना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच जेवण केलेल्या अनेक मुलींना उलटीचा त्रास सुरु झाला. अचानक सुरु झालेल्या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये एकच खळबळ व घाबरगुंडी उडाली. इतर विद्यार्थिनींनी समर्थनगर येथील एका खासगी रुग्णालयात बाधित विद्यार्थिनींना उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी रात्रीपासून बाधा झालेल्या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. यातील चौघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काहींना सुटी मिळाल्याचेही विद्यार्थिनींकडून सांगण्यात आले.

मेसचे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे, मात्र आम्हाला वसतिगृहातच भोजनाची सक्ती महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केल्यास आम्हाला त्रास दिला जातो. त्यामुळे आम्ही काहीच बोलत नाही.
- एक विद्यार्थिनी

इन्फेक्‍शनमुळे विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आता सर्व मुलींची प्रकृती चांगली आहे. वसतिगृहातील ही मेस गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून ज्या चालवतात, त्यांची कधीही कोणती तक्रार आलेली नाही. आम्हालाही विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉ. व्ही. व्ही. पुरोहित, प्रभारी प्राचार्या

Web Title: aurangabad news student