उद्योगमंत्र्यांची औरंगाबादेत पर्यावरणपूरक रिक्षातून सफारी

सुषेन जाधव
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बॅटरीवर चालणारा पर्यावरणपूरक रिक्षा चालविण्याचा आज (शुक्रवार) आनंद घेतला. शहरातील पीईएस महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. मॅक्सि कंपनीची ही रिक्षा 8 ते 9 तास चार्जिंग केल्यानंतर 70 ते 80 किलोमीटर धावू शकते. यामध्ये ४ ट्युबूलार बॅटऱ्या असून या इंधनविरहित रिक्षाची किंमत १ लाख २० हजार असल्याचे डीलर मिलिंद खोडे यांनी सांगितले.

सहा तासात 4 युनिट वीज खर्च होत असून २८ रुपयात 80 किलोमीटर चालते. रिक्षासोबतच महिंद्रा कंपनीने उपलब्ध केलेली बॅटरीवर चालणारी चारचाकी चालविण्याचाही मंत्री देसाई यांनी आनंद घेतला. या गाडीला 8 तास चार्जिंग केल्यास १५० किलोमीटर चालते. यावेळी प्राध्यापक वर्ग, विविध कंपन्यांचे अधिकारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad news subhash desai rikshaw