मराठवाड्यातील वनराई वाढविण्यावर भर देणार- सुधीर मुनगंटीवार

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 4 जुलै 2017

औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन मराठवाड्यातील वनराई वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन मराठवाड्यातील वनराई वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मावसाळा परिसरात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते (ता.4) राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा शुभारंभ आणि 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, मुख्य वन संरक्षक पी. के. महाजन, अजित भोसले, उपवनसंरक्षक सतीश वडसकर, भारतीय स्थल सेनेचे कर्नल व्यंकटेश, कर्नल रामेश्वर शर्मा यांची उपस्थिती होती.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऑक्‍टोबर महिन्यात मराठवाडा मंत्रीमंडळ बैठकीत इको टास्क फोर्स बटालियन स्थापन करण्याबाबतचा विशेष निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चेनंतर इको टास्क फोर्स बटालियन स्थापन करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. आता राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनची स्थापना औरंगाबादेत याठिकाणी करण्यात आली आहे. भारताचे जवान आपले संरक्षण करतातच परंतु आता ते वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून तसेच वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे संरक्षण देखील करणार आहेत. त्याचबरोबर जनतेनेही ग्रीन आर्मी, हॅलो फॉरेस्ट (1926) या माध्यमातून अधिकाधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रमामध्ये सहभागी होवून यंदाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीत पुढाकार घेतला आहे. या लक्षांकापैकी आतापर्यंत 2 कोटी 30 लक्षाची वृक्ष लागवडही केली आहे. मराठवाड्याला 45 लक्ष वृक्षलागवडीचे लक्षांक दिले होते, तेही आता लवकरच पूर्ण होणार आहे.

प्रारंभी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते बटालियनच्या कोनशिलेचे अनावरण करुन वृक्षरोपण, वृक्ष पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी इको टास्क फोर्स बटालियनच्या वानिकी क्षेत्रातील नवी पहाट या माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​
Web Title: aurangabad news sudhir mangutivar and forest in marathawada