औरंगाबाद शहरात दोन तरुणांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

नचिकेत हा बीएससी वर्गाचा विद्यार्थी होता. रात्री आईवडिलां सोबत जेवण केल्यानंतर तो झोपला होता. आज सकाळी त्याने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे करण आद्यप अस्पष्ट आहे

औरंगाबाद - बजाजनगर येथील चिंचबन कॉलनीत राहणाऱ्या 20 वर्षीय नचिकेत मुकुंद जोशी आणि शहरातील सिडको भागात राहणाऱ्या आदित्य महाले या तरुणानी गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली.

नचिकेत हा बीएससी वर्गाचा विद्यार्थी होता. रात्री आईवडिलां सोबत जेवण केल्यानंतर तो झोपला होता. आज सकाळी त्याने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे करण आद्यप अस्पष्ट आहे. तसेच आदित्य महाले हा शेतकरी असुन, कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: aurangabad news: suicide

टॅग्स