तक्रारी घ्या, कन्व्हिक्‍शन रेट वाढवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - पोलिस आयुक्‍त म्हणून पदभार घेतल्यानंतर चिरंजीव प्रसाद यांनी एकीकडे सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कडक सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तपासावर अधिक भर देऊन कन्व्हिक्‍शन रेट वाढवा, नागरिकांच्या तक्रारींची सुयोग्य दखल घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 

चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी (ता. १३) पहिली क्राईम मीटिंग घेतली. चार तास ही बैठक चालली. यात पोलिस दलातील उच्चपदस्थांसह सर्व अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अकरा व बारा मे रोजी शहर दंगलीने भरडले. यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले.

आयुक्तांकडूनही राष्ट्रीय एकात्मता अभियान राबविण्यात येत आहे. शांततेसाठी तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही स्थितीत ठोस कृती करावी, शहरात सर्वत्र चोख गस्त वाढवावी, वॉरंट, समन्स वेळेवर बजावणे; तसेच गुन्ह्यांचा सखोल तपास करून कन्व्हिक्‍शन रेट वाढवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा पोलिस आयुक्तांनी बैठकीत घेऊन तपासाबाबत सूचनाही केल्या. वाहनांची जीपीएस यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. 

दरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी नुकतीच पकडली. यात संशयितांकडून जप्त केलेले मोबाईल फिर्यादी भानुदास बडक (रा. जाधववाडी) व सरफराज सिराज मोहियोद्दीन सिद्दिकी (रा. कैसर कॉलनी, रोषणगेट) यांना क्राईम मीटिंगदरम्यान आयुक्त प्रसाद यांनी परत केले.

चौदा शासन  निर्णयानुसार काम करा
नागरिकांच्या प्रत्येक तक्रारींची दखल घ्यावी, या तक्रारींचे निराकरण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. कन्व्हिक्‍शन रेट वाढवण्यासाठी चौदा शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. त्यात कन्व्हिक्‍शन रेट वृद्धीसाठी काय करावे याची माहिती आहे, त्यानुसार काम करण्याचेही आयुक्तांनी सांगितले.

Web Title: aurangabad news Take the complaints increase the quote rate