शिक्षकाने घेतले दोनशे मुलींचे शैक्षणिक पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - कन्नड येथील शिक्षक भीमराव देवराव जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ मातंग समाजातील २०० गरजू मुलींचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलींना मंगळवारी (ता. २४) दुपारी १२ वाजता गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सिडको, एन- आठ येथील क्रांतिगुरू लहुजी साळवे चौकातील सप्तपदी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. 

समाजातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि त्यांनी प्रगती करावी, या हेतूने मुलींच्या पालकांनाही ते शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करीत आहेत. याचाच भाग म्हणून पुंजाबाई जाधव व देवराव जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांनी समाजातील २०० गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्त्व घेतले आहे. या मुलींना शाळेचा गणवेश, शालेय साहित्य, दप्तर व त्यांच्या पालकांना आहेर दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे राहणार आहेत.

 प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हर्षवर्धन जाधव, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, मगदूम फारुकी, अशोक मगर, लिंबाजी गोफणे, राजू अहिरे, मधुकर गोफणे, गंजानन फुंडे, आर. जी. देशमुख, श्री. गोकले, श्रीमती शहा, एम. एम. पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्‍ते म्हणून भारतीय दलित संसदचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास सगट, एकलव्य भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे विचार व्यक्त करणार आहेत.

Web Title: aurangabad news teacher education