शाळा सोडून खंडपीठात आलेल्या शिक्षकांच्या रजा रद्द करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

शिक्षकांवर खंडपीठाची नाराजी

औरंगाबाद: राज्य शासनाने शिक्षकांच्या बदलण्यासंदर्भात घेतलेल्या नवीन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गुरुवारी (ता. 29) न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली; मात्र शाळा सोडून सुनावणीला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षकांबद्दल खंडपीठान तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षक शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याची टिप्पणी करीत, 27 व 29 सप्टेंबरला ज्या याचिकाकर्त्या शिक्षकांनी रजा टाकून खंडपीठात हजेरी लावली. त्यांच्या रजा रद्द करून अनुपस्थिती नोंदविण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने दाखल याचिकेची पुढील सुनावणी 3 ऑक्‍टोबरला ठेवण्यात आली, तोपर्यंत बदलीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे निवेदन सरकारी वकिलांनी केले. याचिकेवर 27 सप्टेंबरच्या सुनावणीच्या वेळीच शिक्षकांनी मोठी उपस्थिती असल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. असे असताना आज पुन्हा शिक्षकांनी खंडपीठात हजेरी लावली. त्यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

राज्य शासनाने सप्टेंबरला काढलेल्या नवीन शासन निर्णयानुसार होणाऱ्या बदल्यांना स्थगिती द्यावी; तसेच बदल्या रद्द कराव्यात यासाठी प्राथमिक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध अकरा याचिका दाखल केल्या आहेत.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात फेब्रुवारीमध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता. याला शिक्षकांनी विरोध करीत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने, फेब्रुवारी काढण्यात आलेला शासन निर्णय वैध असून, त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, राज्य शासनाने 12 सप्टेंबरला नवीन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या रद्द कराव्यात, यासाठी शिक्षकांनी अकरा याचिका दाखल केल्या आहेत. या बदल्यांना स्थगिती देण्यात यावी, त्या रद्द करण्यात याव्यात अशी विनंती याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे, ऍड. शैलेश ब्रह्मे, ऍड. शिवकुमार मठपती, ऍड. सुविध कुलकर्णी, ऍड. गजानन क्षीरसागर, ऍड. रवींद्र गोरे काम पाहत आहेत.

Web Title: aurangabad news teacher leave and court