स्वच्छतागृहे तयार, तरीही टमरेलचाच आधार! 

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद -  केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त भारत म्हणजे स्वच्छ भारत मिशन अभियान राबविले. त्यानुसार राज्यात शंभर टक्के स्वच्छतागृहे बांधल्याचा शासन दरबारी अहवालही सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत 436 गावे-वस्त्यांमध्ये आजही टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याने स्वच्छतागृहे वापरायची कशी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांवर हाती टमरेल घेत उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. 

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्‍तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची हाक देत मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केला. यासाठी प्रत्येक विभागाला स्वच्छतागृह बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 2012 च्या बेसलाइन सर्व्हेनुसार मराठवाड्यातील 23 लाख 257 कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गावे पाणंदमुक्त करण्यात आली असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच शासनाला सादर करण्यात आलेला आहे. 

विशेष म्हणजे, एकीकडे मराठवाड्यातील पूर्ण गावे शंभर टक्‍के पाणंदमुक्त झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे पुरेसे पाणीच उपलब्ध होत नसल्याने योजना यशस्वी झालेली नाही. पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आला तरी अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. पिण्यासाठीच पाणी नसल्याने या गावांमध्ये सर्रास उघड्यावर टमरेल घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

आठवडाभरातच 152 टॅंकरची भर 
औरंगाबाद जिल्ह्यात 370 गावे, 14 वस्त्या; तर नांदेड जिल्ह्यातील 20 गावे, 32 वाड्यांवर बुधवारपर्यंत (ता. 11) 466 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टॅंकरच्या संख्येत 152 एवढी वाढ झाली आहे.

Web Title: aurangabad news toilet issue Swachh Bharat mission