ट्रकचोरी, विक्री अन्‌ नंतर इन्शुरन्सचा क्‍लेम  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद  शहरातील तरुणांना हाताशी धरून हॉटेल्स, थांबे, ढाब्यावरील ट्रक लंपास करायचे, त्यांची विक्री करायची; त्यानंतर वाटे करून नंतर उर्वरित पैसे मिळवण्यासाठी ट्रकचा इन्शुरन्स क्‍लेम करायचा, अशी ‘मोडस’ वापरून ट्रक चोरणाऱ्या टोळीतील तिघांना गुरुवारी (ता. सहा) पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद  शहरातील तरुणांना हाताशी धरून हॉटेल्स, थांबे, ढाब्यावरील ट्रक लंपास करायचे, त्यांची विक्री करायची; त्यानंतर वाटे करून नंतर उर्वरित पैसे मिळवण्यासाठी ट्रकचा इन्शुरन्स क्‍लेम करायचा, अशी ‘मोडस’ वापरून ट्रक चोरणाऱ्या टोळीतील तिघांना गुरुवारी (ता. सहा) पोलिसांनी अटक केली.

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले, की विजय भगवान जाधव (३१), विनोद दामोदर अरबट (४२, दोघे रा. अय्यप्पा मंदिरासमोर, बीड बायपास) व सादिक शेख नूर मोहम्मद शेख (रा. मौलवीगंज, धुळे) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील कवडे (रा. येवला, नाशिक) व पोलिस नाईक संदीप नामदेव मानकापे (जवाहरनगर पोलिस ठाणे) हे संशयित अद्याप पसार आहेत. १४ जूनला मध्यरात्री झाल्टा फाट्याजवळील अंबिका पेट्रोलपंप परिसरातून हायवा ट्रक (एमएच २०, सीटी ३९०९) अज्ञातांनी लंपास केला होता. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात नोंद झाली. चिकलठाणा पोलिसांनी ट्रकमालकाशी चर्चा केली. त्या वेळी त्याने विजय जाधव व विनोद अरबट यांच्यावर संशय व्यक्त केला. हाच धागा पकडून बीड बायपास परिसरातून संशयित दोघांना अटक केली. याप्रकरणात जवाहरनगर ठाण्याचा पोलिस नाईक संदीप मानकापे याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रकचोरी प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची तलवार टाळण्यासाठी मानकापेने न्यायालयात धाव घेतली. जामीन नामंजूर केल्यास त्याला अटक केली जाणार आहे

धुळ्यातील आझादनगर ठाण्यात चौदा, निझामपूर ठाण्यात दोन, धुळे तालुका ठाण्यात एक, नंदूरबार येथील ठाण्यात एक, बिडकीन ठाण्यात एक तसेच चिकलठाणा ठाण्यात एक असे वीस गुन्हे संशयिताविरुद्ध नोंद आहेत.  

विमा आणि वाटेकरी 
विशेषत: ट्रकचोरीनंतर संशयित भंगार विक्रेत्यांना तसेच ठरावीक व्यक्तींनाच ट्रक विकत होते. त्यातील पैशांचे वाटे करून इन्शूरन्सही मिळवत असल्याचे समोर आले.

Web Title: aurangabad news Truck Choker, Sale and After Life Insurance Claim