तुरीचे आठशे कोटी देण्यासाठी याचिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - राज्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे आठशे कोटी रुपये देण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे व न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर झाली. दरम्यान, सरकारतर्फे निवेदन करण्यात आले. यावर आता 9 एप्रिलला सुनावणी होईल. 

राज्यातील शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी ते 23 मार्च या काळात एक लाख 52 हजार टन तूर कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत "नाफेड'ने खरेदी केली होती; मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाहीत. लातूर येथील याचिकाकर्ते राहुल माकणीकर यांनीही बाजार समितीला तूर विक्री केली होती. तुरीची रक्कम मिळत नसल्याने त्यांना अनेक शेतकऱ्यांनी तुरीच्या देयकांसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली होती. त्यामुळे माकणीकर यांनी मुख्य सचिवांकडे शेतकऱ्यांच्या तुरीचे पैसे मिळावेत, यासाठी निवेदन दिले. प्रत्यक्षात मात्र निवेदनावर काहीही निर्णय न घेतल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. 

Web Title: aurangabad news tur agriculture farmer Petition for eight crore rupees