उदयनराजेंनी भिडे, एकबोटेंना पाठीशी घालू नयेः संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

औरंगाबाद : कोरेगाव भीमा प्रकरण हे अचानक नाही, तर सरकारच्या माध्यमातून संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट रचून घडवून आणले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना पाठीशी घालू नये. उदयनराजे हे छत्रपतींचे वारसदार आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करतो; परंतु त्यांनी छत्रपतिपदाचा गैरवापर करू नये, अशी भूमिका आज (शनिवारी) संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

डॉ. भानुसे म्हणाले, "कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असताना शांततेसाठी आम्ही प्रयत्न केले. त्यासाठीच ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या बंदला पाठिंबा दिला. 1818 चे युद्ध सन्मानासाठी झाले होते; परंतु ते युद्ध मराठा विरुद्ध महार असे झाल्याचे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे खोटे सांगत आहेत. त्यातूनच सामाजिक तेढ निर्माण होत आहे. या युद्धात 22 महार, 18 मराठे, आठ मुसलमान असे विविध जातिधर्मांचे मावळे शहीद झाले होते.''

गेल्या पाच-सहा वर्षांत काही समाजविघातक मनुवादी घटना घडवून आणत आहेत. त्यामुळे वढू बुद्रुक, भीमा- कोरेगाव परिसरात स्थानिकांचा जो गैरसमज झालेला आहे, तो दूर करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा. त्यांनी सातारा सोडावे, आम्ही त्यांच्यासोबत फिरायला तयार आहोत. त्याचबरोबर समाधीचे एकत्रित येऊन पुनरुज्जीवन करावे लागेल. यासाठीही आमचे सहकार्य आहे; मात्र उदयनराजेंनी भिडे, एकबोटेंना पाठीशी घालू नये. त्या दोघांवर दंगली घडविल्यामुळे गुन्हे दाखल असून तडिपारीच्या नोटिसा आहेत. याची माहिती उदयनराजेंनी पोलिसांकडून घ्यावी, असेही डॉ. भानुसे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चुकीचा इतिहास सांगणारे भिडे, एकबोटेंची नार्को टेस्ट करून चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने या वेळी केली.

Web Title: aurangabad news udayanraje should not be supported to bhide ekbote: Sambhaji Brigade