पाकिस्तानशी बोलणी नाही, युद्ध करा: डॉ. प्रविण तोगडीया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : "गावात शेतकरी कर्जाने मरत आहेत, तर सीमेवर पाकिस्तानी गोळीने सैनिक मरत आहेत. यामूळे आता बोलणी नव्हे तर युद्ध करण्याची वेळ आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यध्यक्ष डॉ. प्रविण तोगडीया मांडले.

एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता त्यांनी आज (शनिवार) जे. जे. हॉस्पीटल येथे पत्रकारांशी संवाद साधला. श्री. तोगडीया म्हणाले, पठाणकोट, उरी असे बरेच हल्ले झाले आता बोलणीची वेळ नाही. टॅक मिसाईलचा वापर करून पाकिस्तानवर हल्ला करा.

सरकारकडून आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचा अरोप करून तोगडिया म्हणाले, 'देशाचे आरोग्य हे आय.सी.यु वर आहे. देशात तीन लोकांपैकी एक जण रुग्ण आहे. देशात 45 कोटी रुग्ण आहे. म्हणजेच 33 टक्‍के आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ही संख्या एक टक्‍का होती. देशात आरोग्यावर 14 लाख कोटी रूपये खर्च होतो. येणाऱ्या वीस वर्षात दोन पैकी एक जण रुग्ण असणार आहे. दिडशे कोटी लोकसंख्या झाल्यानंतर त्यापैकी 75 कोटी रग्ण असणार आहे. तेव्हा हा खर्च 280 लाख कोटी होत देशाचे आर्थिक पतन होईल. 25 ते 30 कोटी परिवारपैकी एक कोटी परिवारात आजारपण येते. यामूळे दरवर्षी एक कोटी परिवार कर्जात बुडत आहे. बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी खर्च आरोग्यावर करण्यात येत आहे. देशातील जीडीपी पैकी केवळ दोन टक्‍कापेक्षा कमी खर्च आरोग्यावर करण्यात येत आहे. देशात असलेल्या आरोग्य केंद्रावर डॉक्‍टर नाही. 50 कोटी लोकांना 5 लाख रुपये खर्च देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. मात्र, यासाठी 50 हजार कोटी रूपयांचे हे प्रिमीयमचा पैसा सरकार कोठून आणणार आहे. आम्ही आरोग्यासाठी एक लाख डॉक्‍टर आणि एक लाख हेल्थ ऍम्बेसेडरच्या माध्यामतून हेल्दी लाईफ स्टाईलसाठी काम करीत आहोत.'

यावेळी संजय बारगजे व डॉ. जीवन राजपूत उपस्थित होते.

Web Title: aurangabad news vhp pravin togadia pakistan war india health