शहरात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - पैठण येथील विद्युत उपकेंद्रात वीज वितरण कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १४) चोवीस तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या जायकवाडी धरणावरील वीजपपांचा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील पाणीपुरवठाही बंद राहील. त्यानंतर पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार आहे. 

महापालिकेच्या जायकवाडी धरणावरील पाणी उपसा करणाऱ्या विद्युतपंपांना पैठण येथील १३२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्यामुळे वीज वितरण कंपनीने  महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ असा बारा तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे. परिणामी महापालिकेचे पाणीपुरवठा योजनेचे पंपदेखील बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात जुन्या शहराला व सिडको-हडको भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. 

रात्री नऊनंतर पंप सुरू होणार असले तरी संपूर्ण शहरातील पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागू शकतो. शुक्रवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे त्या दिवशी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली.

Web Title: aurangabad news water