पाडव्यालाही शहरावर पाणीटंचाईचे संकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - ऐन दिवाळीतही पाणीटंचाईचे संकट कायम असून, शुक्रवारी (ता. २०) पाडव्याच्या दिवशीही जुन्या शहरात विलंबाने पाणी मिळण्याची शक्‍यता आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रालगत व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी (ता. १९) जायकवाडीतून काहीकाळ पाणीपुरवठा बंद केला होता. सुमारे ४५ मिनिटे खंड घेण्यात आल्याने तीन तास शहराकडे कमी दाबाने पाणी आले.

दरम्यान, पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून प्रत्येक जलकुंभावर अधिकारी नियुक्ती करण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी फारोळा केंद्राला लागूनच असलेला ५६ एमएलडी प्रकल्पाच्या जुन्या सातशे मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी सकाळी दुपारी एक ते अडीच वाजेच्या दरम्यान दोन टप्प्यांत जुनी वाहिनी बंद करण्यात आली होती. या वेळेत शहराकडे कमी दाबाने पाणी आले. परिणामी, शहरातील काही पाण्याच्या टाक्‍या भरण्यास अधिक वेळ लागला. यामुळे शुक्रवारी शहराच्या काही भागात कमी दाबाने तर काही भागात उशिराने पाणी मिळण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, १४०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीतून पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: aurangabad news water