रागात गेलेला मुलगा सापडला व्हॉट्‌सऍपच्या मदतीने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - परभणी जिल्ह्यातील एक किशोरवयीन मुलगा रागाच्या भरात निघून गेला. पॅसेंजर रेल्वेत बसून तो पंढरपूरला (जि. सोलापूर) पोचला. मात्र, व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माहितीने पोलिसांना हा मुलगा सुखरूप हाती लागला. त्याला पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. 

गणेश चौधरी (वय तेरा, रा. बोरी, ता. जिंतूर) या मुलाला शुक्रवारी (ता. 14) आई रागावली. त्याला ट्युशनला जाण्यासाठी आईने वीस रुपये दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात त्याने थेट परभणी रेल्वेस्थानक गाठले. तो सरळ पंढरपूरला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत जाऊन बसला आणि पंढरपूरला पोचला. त्याने विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुलाची शोधाशोध सुरू झाल्यानंतर औरंगाबादेतील त्याचे नातेवाईक सहायक पोलिस निरीक्षक श्री. सोळंके यांनी ही माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. माहिती मिळताच सोमाणी यांनी ही माहिती व त्याचा फोटो "महाराष्ट्र पोलिस मित्र' व्हॉट्‌सऍप ग्रुपवर टाकला. या ग्रुपमध्ये रेल्वेचे शंभरावर पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी जोडलेले आहेत. पोलिसांना ही माहिती मिळताच रविवारी (ता. सोळा) दुपारी साडेबाराच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेले उपनिरीक्षक सुनील अवसरमल, जमादार संजय चिटणीस यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर गणेश हा पंढरपूर रेल्वेस्थानकात आढळून आला. ही माहिती मिळताच त्याच्या नातेवाइकांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: aurangabad news whatsapp