दाभोलकरांचे खुनी पकडणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे लोटली, तरी मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. इतर अनेक माध्यमांतून विचारांची गळचेपी सुरू आहे. याच्या निषेधार्थ शहरातून रविवारी (ता. २३) निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडणार कधी, असा प्रश्‍न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला.

औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे लोटली, तरी मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. इतर अनेक माध्यमांतून विचारांची गळचेपी सुरू आहे. याच्या निषेधार्थ शहरातून रविवारी (ता. २३) निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडणार कधी, असा प्रश्‍न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे २० जुलै ते २० ऑगस्टदरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रव्यापी जिल्हा पदाधिकारी ‘निर्धार कार्यशाळे’ला जमलेल्या पदाधिकाऱ्यांसह रविवारी (ता. २३) निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत आणि अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांच्या नेतृत्वात सकाळी सात वाजता सिध्दार्थ गार्डनपासून सुरु झालेला हा वॉक मिलकॉर्नर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून औरंगपुऱ्यात आला. येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या वॉकचा समारोप करण्यात आला. 

निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव माधव बावगे (लातूर), सुशीला मुंडे (डोंबिवली), मिलिंद देशमुख (पुणे), प्रशांत पोतदार (सातारा), डॉ. हमीद दाभोलकर यांच्यासह राज्यातील शंभर कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर शहरातील डॉ. रश्‍मी बोरीकर, डॉ. शुभांगी पाळवदे, डॉ. जयश्री गोडसे, शिरीष तांबे, मधुकर खिल्लारे, डॉ. श्‍याम महाजन, प्रा. डॉ. अजित खोजरे, व्ही. सी. भुयागळे आदींचा सहभाग होता. या वॉकच्या यशस्वितेसाठी सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, वासुदेव देशपांडे, सुनील उबाळे, प्रशांत कांबळे, प्रसाद जोशी, अनंत काळे, दिलीप शिखरे आदींनी परिश्रम घेतले.

अविनाश पाटील यांचा सत्कार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांच्याकरिता २२ आणि २३ जुलैला दोनदिवसीय निर्धार मेळावा घेण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्रात झालेल्या या मेळाव्यात राज्यातील ७६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. जात पंचायतींच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा’ शासनाकडून मंजूर करुन घेण्यात महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला. यानिमित्त निर्धार कार्यशाळेत अंनिसच्या औरंगाबाद शाखेतर्फे भालचंद्र कानगो यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा महात्मा गांधी पुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: aurangabad news When did Dabholkar receive a murderer?