औरंगाबाद: टेम्पोच्या धडकेत भाविक महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

उत्तर प्रदेशमधील कुरसा येथील रहिवाशी लालमती तीन महिन्यांपूर्वी शहरात रंगकामाचे कंत्राट घेणाऱ्या पती रामआशिष (रा उस्मानपुरा) यांच्याकडे आल्या होत्या. नवरात्रीचे कडक उपवास करणाऱ्या लालमती रोजच्या प्रमाणे सकाळी कर्णपुरा येथे दर्शनास जात होत्या.

औरंगाबाद : कर्णपुरा येथील तुळजा भवानीचे दर्शनासाठी सोमवारी (ता 25) जात असलेल्या पन्नास वर्षीय महिलेला भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने उडविल्याने महिला जागीच ठार झाली. लालमती रामआशीष पासवान असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील कुरसा येथील रहिवाशी लालमती तीन महिन्यांपूर्वी शहरात रंगकामाचे कंत्राट घेणाऱ्या पती रामआशिष (रा उस्मानपुरा) यांच्याकडे आल्या होत्या. नवरात्रीचे कडक उपवास करणाऱ्या लालमती रोजच्या प्रमाणे सकाळी कर्णपुरा येथे दर्शनास जात होत्या. कोकणवाडी येथे रस्ता ओलांडताना रेल्वेस्टेशन कडून शहरात जाणाऱ्या भरधाव आयशरने (एम एच 04: 3315) सोमवारी सकाळी सव्वा चार वाजता धडक त्याल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

उत्तरीय तपासणीसाठी त्यांना घाटीत हलवण्यात आले. अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशातील त्यांच्या मुळगावी करण्यासाठी कुरसा येथे रवाना झाले. या प्रकरणातील आयशरच्या चालकाला वेदांत नगर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास दिलीप घोरपडे करत आहे.

Web Title: Aurangabad news women dead in accident