प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू 

योगेश पायघन
रविवार, 3 सप्टेंबर 2017

प्रसूतीतज्ज्ञ नसलेल्या डॉक्‍टरचा रुग्णांच्या जीवांशी खेळ 
प्रसूतीत तज्ज्ञ नसतांना अप्रशिक्षित डॉक्‍टर प्रसुती दरम्यान होणारा अतिरिक्तस्त्राव रोखू शकत नाही. परिणामी महिलेला आपला जीव गमविण्याची शक्‍यता असते. सहा महिन्यापूर्वी वाळूज परिसरात याच प्रकारे एक महिला दगावल्याची घटना घडली होती. दरम्यान, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर घाटीच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाला होता. परंतू त्या डॉक्‍टर आणि संबंधित यंत्रणेने यावर पडदा पाडला. खाजगी दवाखान्यांमधील त्रुटींसाठी जिल्हा शल्यचिकिस्तक कार्यालयाकडून जिल्ह्यातील डॉक्‍टरांची तपासणी झाली. तरीही नर्सिंगची परवानगी नसताना होमिओपॅथीचे डॉक्‍टर प्रसूती करतात, एकंदरीत असे जीवघेणे प्रकार गंभीर असल्याची भावना एका जेष्ठ तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञाने व्यक्त केली.

औरंगाबाद : गंगापूर येथील होमियोपॅथीच्या डॉक्‍टरांनी एका महिलेची नॉर्मल प्रसूती केली. प्रसूतीदरम्यान होत असलेला अतिरक्तस्त्राव झाला. तो डॉक्‍टरांना थांबवता न आल्याने तेवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.2) घडली. शालिनी कट्टे असे मृत महिलेचे नाव असून डॉ. पानकडे (गंगापूर) दाम्पत्याच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप शालिनी यांचे पती दत्तात्रय कट्टे यांनी केला आहे. 

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर संबंधित महिलेला घाटीत दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पाच दिवसांत साठ रक्त घटक लावूनही महिलेचे प्राण वाचू शकले नाही. अप्रशिक्षित डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाने प्रसूती दरम्यान झालेल्या अतिरिक्त स्राव न थांबता आल्याने महिला दगावन्याची सहा महिन्यामधील दुसरी घटना आहे. गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात 108 रुग्णावाहिकेत डॉक्‍टर म्हणून कार्यरत डॉ. अरुण पानकडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री पानकडे या त्याच रुग्णालयात राष्टीय आरोग्य अभियानात होमियोपॅथीच्या डॉक्‍टर म्हणून काम करतात. तसेच हे दाम्पत्याचे गंगापूर येथे खाजगी रुग्णालय आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या शालिनी यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी डॉ राजश्री यांनी बोलाविल्याचे शालिनी यांचे पति दत्तात्रय कट्टे यांनी सांगितले. तदनंदर सहा महिन्यापासून याच डॉक्‍टरांकडे शालिनी उपचार घेत होत्या. सोमवारी (ता. 28) ला प्रसूतीसाठी शालिनी यांना दाखल करण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास नार्मल प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव सुरु झाला तो थांबण्यात सकाळी सहा वाजेपर्यंत रक्तस्त्राव सुरुच होता, त्यामुळे सकाळी डॉ. पानकडे यांनी शालिनी यांना औरंगाबादला हलवण्याचे सांगितल्याचे श्री. दत्तात्रय कट्टे म्हणाले.

मंगळवारी (ता. 29) शालिनी यांना घाटीत दाखल केले तेव्हा ते अत्यवस्थ, बेशुद्ध होती. त्यानंतर शालिनीचा रक्तस्राव थांबण्यासाठी घाटीच्या डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. तिला साठ रक्त पिशव्या व रक्तघटक पुरवण्यात आले. परंतु किडनी आणि यकृतात इन्फेक्‍शन झाल्यामुळे उपचारादरम्यान शनिवारी (ता. 2) संध्याकाळी आठ वाजता मृत झाली असे घाटीच्या डॉक्‍टरांनी सांगितले. श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या डॉक्‍टर दाम्पत्याच्या हलगर्जीपणामुळे शालिनीला जीव गमवावा लागला असा आरोप महिलेचे पती दत्तात्रय कट्टे यांनी केला आहे. मात्र, डॉ. पानकडे दाम्पत्यांशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शालिनी यांना एक मोठा मुलगा असून तो पहिलीच्या वर्गात शिकतो. तर प्रसूतीदरम्यान झालेला मुलगा खासगी रुग्णालयात दाखल आहे. 

प्रसूतीतज्ज्ञ नसलेल्या डॉक्‍टरचा रुग्णांच्या जीवांशी खेळ 
प्रसूतीत तज्ज्ञ नसतांना अप्रशिक्षित डॉक्‍टर प्रसुती दरम्यान होणारा अतिरिक्तस्त्राव रोखू शकत नाही. परिणामी महिलेला आपला जीव गमविण्याची शक्‍यता असते. सहा महिन्यापूर्वी वाळूज परिसरात याच प्रकारे एक महिला दगावल्याची घटना घडली होती. दरम्यान, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर घाटीच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाला होता. परंतू त्या डॉक्‍टर आणि संबंधित यंत्रणेने यावर पडदा पाडला. खाजगी दवाखान्यांमधील त्रुटींसाठी जिल्हा शल्यचिकिस्तक कार्यालयाकडून जिल्ह्यातील डॉक्‍टरांची तपासणी झाली. तरीही नर्सिंगची परवानगी नसताना होमिओपॅथीचे डॉक्‍टर प्रसूती करतात, एकंदरीत असे जीवघेणे प्रकार गंभीर असल्याची भावना एका जेष्ठ तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञाने व्यक्त केली.

Web Title: Aurangabad news women dead in hospital