औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद जळगाव महामार्गालगत असलेल्या महाल किन्होळा (फर्शी) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारु विक्री होत होती. यामुळे अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले होते.

वडोद बाजार - महाल किन्होळा ( ता.फुलंब्री, जि. औरंगाबाद) गाव पुर्णता दारूमुक्त करण्यासाठी रणरागिणी एकवटल्या असून, त्यांनी फिल्मी स्टाइलने अवैध दारू विक्रेत्यांच्या घरातून बाटल्या काढून रोडवर फोडल्याची घटना आज (सोमवार) घडली.

औरंगाबाद जळगाव महामार्गालगत असलेल्या महाल किन्होळा (फर्शी) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारु विक्री होत होती. यामुळे अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले होते. ही दारू विक्री बंद करावी यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते, त्यानुसार आज सकाळी महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये गावातील दारु विक्री पूर्णता बंद करण्यासाठी ठराव घेण्यात आला.

ग्रामसभा झाल्यानंतर महिलांनी थेट अवैध दारु विक्रेत्यांच्या घरात घुसुन दारुच्या बाटल्या काढून महामार्गावर फोडल्या त्यातील उरलेल्या बाटल्या घेवून थेट वडोद बाजार पोलिस ठाणे गाठून मुद्देमाल जमा करीत तक्रार देण्यात आली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​

Web Title: Aurangabad news womens agitation against liquor shop