मल्लांच्या श्रमांना हवी सुविधांची जोड 

मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात मल्लांच्या श्रमांना फळ मिळणे कठीण झाल्याने स्पर्धात्मक कुस्तीत येथील खेळाडू मागे पडतात. राजाश्रय, सुविधांचा अभाव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन नसल्याने एका विशिष्ट वयानंतर मल्ल चाचपडतात आणि त्यांचा खेळ विकसित होण्याची प्रक्रिया खुंटते. येथील मल्ल मेहनत करतात; पण त्यांना आज साथ हवी ती स्पर्धात्मक प्रशिक्षणाची, अशी भावना मल्ल आणि प्रशिक्षकांमधून व्यक्त होत आहे.  

मराठवाड्यातील शहरी-ग्रामीण भागात कुस्तीने पाळेमुळे रोवली आहेत. येथील कुस्तीगीर मातीवरून मॅटवर येताना सुविधा नसल्याने चाचपडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पंजाब आणि हरियानामध्ये सरकारने ज्या पद्धतीने या खेळात लक्ष घालून त्याला पुढे नेले, तसे प्रयत्न दुर्दैवाने मराठवाड्यात झाले नाही, अशी खंतही व्यक्त होत आहे. वयाच्या आठ ते दहा वर्षांमध्ये मुले कुस्तीकडे वळतात. उपलब्ध सुविधांमध्ये धडेही गिरवतात; पण स्पर्धात्मक कुस्ती शिकण्यासाठी सुविधा नसल्याने हे विद्यार्थी एक तर खेळ सोडतात किंवा जत्रेत कुस्ती खेळत फिरतात. ज्यांना यापलीकडे जाण्याची इच्छा असते ते इतरत्र सराव आणि शिकण्यासाठी जातात. 

किमान तालुक्‍याला असावी मॅट 
आज कुस्तीचे भविष्य मातीऐवजी मॅटवर गेले आहे. राज्य, राष्ट्रीय, आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मॅटचा वापर होत असताना आपल्याकडे सर्व तालुक्‍यांमध्ये मॅट उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलांचा खेळ स्पर्धेला पूरक होण्यासाठी अडथळे येत आहेत. 

अभ्यासक्रम, प्रशिक्षकाची गरज  
पंजाब आणि हरियानामध्ये विद्यार्थीदशेतील मल्लांसाठी विशेष अभ्यासक्रमाच्या आधारावर कुस्तीची तयारी करून घेतली जाते. असाच नियोजित आणि स्पर्धांवर आधारित अभ्यासक्रम मराठवाड्यातील मल्लांसाठी नितांत गरजेचा बनला आहे. दर्जेदार प्रशिक्षकांची फळीही यात असणे अत्यंत गरजेचे आहे. 

मराठवाड्यातील कुस्तीला स्पर्धाभिमुख करायचे असेल आणि खेळाडू स्पर्धेत टिकवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत मॅट उपलब्ध करून द्यावी. त्याशिवाय परिपूर्ण खेळाडू घडणार नाही.  
- वीरेंद्र भांडारकर,  उपसंचालक, भारतीय खेळ प्राधिकरण

भारतीय खेळ प्राधिकरण (साई) मध्ये जागा आणि दर्जेदार प्रशिक्षण केंद्र सुरू करायला काहीच हरकत नाही. यातून स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्‍यक असेलेली कुस्ती शिकता येईल. शिवाय खुराकीचे प्रश्‍नही मार्गी लागतील. ही जुनी मागणी पूर्ण व्हायला हवी. 
- डॉ. हंसराज डोंगरे, ज्येष्ठ कुस्ती मार्गदर्शक

Web Title: aurangabad news Wrestling