पार्किंगला शिस्त एका दिवसापुरतीच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांना शिस्त लावणार असल्याचे सांगितले आणि दोन दिवसांनी अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हा परिषदेत दौऱ्याचे निमित्त झाले. समिती येणार म्हणून गेल्या बुधवारी (ता. सहा) जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर चकचकीत दिसला. यामुळे कायम असेच चित्र राहील, असे वाटणाऱ्यांचा स्वप्नभंग झाला आणि वाहने पुन्हा बेशिस्तपणे जिल्हा परिषदेच्या आवारात उभी असल्याचे चित्र दिसायला सुरवात झाली.  

जिल्हा परिषदेच्या परिसरात वाहनतळ असतानादेखील अधिकारी आपापल्या विभागासमोर चारचाकी वाहने उभी करीत, तर पदाधिकारी जिथे जमेल त्या ठिकाणी वाहने उभी करीत. दुचाकीधारकांचीही वाहने उभी करण्याची हीच पद्धत होती. यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात एखादी चारचाकी किंवा दुचाकी काढायची असली तर आधी चार वाहने बाजूला सरकविण्याची कसरत करावी लागते. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी (ता. चार) बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांना शिस्त लावून महिनाभरात पार्किंग शिस्तबद्ध लागेल असे सांगितले होते. तत्पूर्वी त्यांनी सर्व खातेप्रमुखांना व सुरक्षारक्षकांना वाहने शिस्तीत उभी करण्यासंदर्भात पत्र दिले होते. योगायोगाने बुधवारी (ता. सहा) जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करून फक्‍त एक व्यक्‍ती जाईल एवढेच गेट खुले ठेवण्यात आले होते. वाहनधारकांना जिल्हा परिषदेच्या मागे वाहने ठेवण्यास सांगण्यात आले. अनुसूचित जाती-जमाती कल्याण समिती येणार असल्याने अशी व्यवस्था केली असावी असे बोलले जात होते; मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे सुरू केली असाही अंदाज बांधला जात होता. याचे प्रत्यंतर दुसऱ्या दिवसापासूनच येण्यास सुरवात झाली. काही पदाधिकाऱ्यांची वाहने अजूनही जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर थांबतात, तर काही सदस्य, अधिकारी जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने उभी करीत आहेत. शिक्षक संघटनांचे नेते तर जिल्हा परिषदेच्या आवारात बेफामपणे गाडी चालवून दिसेल तिथे चारचाकी उभ्या करताना दिसतात. हेच चित्र राहिले तर महिनाभरात वाहन पार्किंगला शिस्त लावण्याची घोषणा खरी ठरेल का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: aurangabad news zp one day parking