औरंगाबाद: मुंडन करून जिल्हा परिषदेत धडकले कर्मचारी

मधुकर कांबळे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

ग्रामपंचायतीकडून पूर्वी मिळणारा पगारही आता बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

औरंगाबाद : टक्कल करून घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज (सोमवारी) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

क्रांतीचौकातुन हा मुंडन मोर्चा काढण्यात आला. दिवाळीपुर्वी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग तीन व वर्ग चारची वेतनश्रेणी लागू करावी. शासनाने आॅक्टोबर 2016 मध्ये आदेश जारी करून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचे आदेश दिले. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून पगार नाही.

ग्रामपंचायतीकडून पूर्वी मिळणारा पगारही आता बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Web Title: Aurangabad news ZP workers agitation