esakal | Aurangabad: मरणानंतरही छळले गेले निष्प्राण देह
sakal

बोलून बातमी शोधा

दफनविधीसाठी कबरी खोदताना उपसावे लागते पाणी
पाचोड : मरणानंतरही छळले गेले निष्प्राण देह

पाचोड : मरणानंतरही छळले गेले निष्प्राण देह

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड : गत महिनाभरापासून अतिवृष्टीने सर्वत्र थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हतबल झाले असताना सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरण्यास जागाच नसल्याने आता दफनविधीसाठी कबर खोदताना नातेवाइकांवर पाणी उपसावे लागते असल्याचे विदारक चित्र पैठण तालुक्यातील थेरगाव येथे दिसून आले आहे. त्यामुळे हे चित्र पाहून "ऐ इन्सान दुनिया के बोझ से कहता है मर जाऊ, लेकिन मर के भी चैन न पाया तो कह जायेगा इन्सान!!'''' या विनोबा भावे यांच्या ओळींचा अर्थ सत्यात उतरल्याचे दिसून येत आहे.

नशिबाबी गफूर शेख (वय ५५, रा. थेरगाव ता. पैठण) यांचे सोमवारी ता.(११) रोजी निधन झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा दफनविधी येथील कब्रस्तानात करण्याचे ठरले. कब्रस्तानात नातेवाइकांनी जाऊन कबर खोदली असता अवघ्या दीड ते दोन फुटांवर पाणी लागल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी आणखी खोल खोदले असता पाणी वाढतच गेले. मात्र, दफनविधी करण्यासाठी पाणी उपसण्याशिवाय पर्याय नसल्याने अनेक नातेवाइकांनी एकत्र येत जसजशी कबर खोल होत होती तस तसं पाणी वाढत असताना अथक परिश्रमाने येथील कबर अखेर खोदली. यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर नशिबाबी यांचा दफनविधी पार पडला.

हेही वाचा: लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

कुणी वृद्धापकाळाने, कुणी अल्पशा आजाराने तर कुणाचा अन्य कारणाने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना पाण्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. मृतदेह पाण्यात भिजू नये म्हणून प्लॅस्टिक कापडामध्ये गुंडाळून ते कबरीत सोडले जात आहे. क्षणात कबरीत पाणी वाढून मृतदेह पूर्णतः पाण्यात बुडत आहे.

मी अनेक पावसाळे बघितले, अनेकांच्या अंत्यविधी, दफनविधीस हजेरी लावली; परंतु यंदा सारखा पावसाळा पाहिला नाही. कबरी खोदताना पाण्याचे झरे लागले. पाणी बाहेर काढताना नातेवाइकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

-शेख दाऊद भिकन, अध्यक्ष, कब्रस्तान व्यवस्थापन समिती, थेरगाव

loading image
go to top